वडिल जाण्याचे दुःख मनात साठवून दहावीच्या परीक्षेत मुलीने मिळवले ९४ टक्के

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. एकीकडे वडिलांच्या जाण्याचे दुःख आणि दुसरीकडे दहावीची परीक्षा पण
उंचगाव शिवाजी नगर (मनेरमाळ) येथील सहना अजित पाचापूरी हिने इतक्या कठीण प्रसंगात ही दहावीची परीक्षा देऊन ९४.४० % मार्क मिळवून यश प्राप्त केले.

दहावीची परीक्षा तोंडावर असतानाच सहनाच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या मित्राच्या वाढदिवसाचा केक कट करत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. सहनाच्या परिक्षेच्या महिन्याभरा पूर्वीच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण अशा परिस्थिती मध्ये ही वडील जाण्याचे दुःख बाजूला ठेवून दहावीच्या परीक्षेचा अभ्यास करून आज सहनाने ९४.४० % मिळवले. वडील जाण्याचे दुःख मनात ठेवून परीक्षा देऊन घवघवीत यश प्राप्त करून सहनाने समाजातील इतर मुलींना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. वडिलांनी आपल्याला शिकवण्यासाठी केलेले कष्ट हे त्यांच्या जाण्याने वाया न घालवता तिने त्यांचं नाव मोठं केलं.