भारतात बनतीये मलेरियावर प्रभावी लस

मच्छरांमुळे संक्रमित होणारा मलेरिया हा आजार भारतासह जगभरात लाखो लोकांचे बळी घेत आहे. या आजारावर प्रभावी औषधांचा अभाव आणि मलेरियाच्या जंतुंमध्ये औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होणे यामुळे या आजारावर मात करणे कठीण होत आहे. पण आता या आजारावर प्रभावी औषध बनण्याची शक्यता दिसत आहे. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या एका ग्रुपने मलेरियाविरुद्ध लसीच्या निर्मितीसाठी आशादायक संशोधन केले आहे. या संशोधनामुळे आजारावर लसी तयार करण्यासाठी नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.

विशेष आण्विक औषध केंद्रातील शास्त्रज्ञांनी मलेरियाच्या जंतू आणि मानवी शरीराच्या पेशींमध्ये होणारा बदल समजून घेतला आहे. इस्सेन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात महत्वाची भूमिका बजावणारे ‘पीएचबी2’ (प्रोहिबिटिन) हे जंतूंचे प्रथिन लसी बनवण्यासाठी उपयुक्त असल्याचे संशोधकांचे मत आहे.

प्राध्यापकांनी सांगितले की, “आमच्या संशोधनात आम्ही एक नवीन PHB2-Hsp70A1A रिसेप्टर लिगंड जोडी ओळखली आहे जी मलेरियाच्या जंतूंना मानवी शरीरात संक्रमण करण्यास रोखते. त्यामुळे जंतुमधील प्रोहिबिटिन प्रथिन ही एक प्रभावी लस बनवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.”

प्राध्यापकांनी पुढे सांगितले की, “कोविड-19 रोग्याच्या वाढीमुळे मलेरिया संशोधनात काही काळ खंड पडला होता. त्यामुळे मलेरियाच्या रुग्णसंख्या आणि मृत्यूदर वाढला. पण हा नवीन शोध जंतुंमध्ये निर्माण होणाऱ्या औषधप्रतिकारशक्तीशी लढण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध करून देण्याची आशा निर्माण करत आहे.” जेएनयूच्या या संशोधनामुळे भविष्यात मलेरियावर प्रभावी लस मिळेल अशी आशा आहे.