पावसामुळे सामना रद्द झाला तर कोण जाणार फायनलमध्ये

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या आयपीएलमध्ये आज क्वालिफायर -२ हा सामना होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्यांना फायनलमध्ये पोहोचता येणार आहे. जो संघ पराभूत होईल त्यांचे आव्हान संपणार आहे. पण जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर फायनलमध्ये कोणता संघ पोहोचणार, याची आता चर्चा होत आहे.

हा सामना चेन्नईला होणार आहे आणि तिथे पावसाचे सावट आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे उशिरा सुरु होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. पण पावसाचा जोर वाढला तर हा सामना रद्दही होऊ शकतो. पण ही बाद फेरी आहे. त्यामुळे दोन्ही संघांना सामना रद्द झाल्यावर प्रत्येकी एक गुण मिळणार नाही. त्यामुळे कोणता संघ फायनलमध्ये जाणार, हे ठरवण्यासाठी काही नियम बनवण्यात आले आहे.हा बाद फेरीचा सामना आहे. त्यामुळे या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. शनिवार हा या सामन्याचा राखीव दिवस असणार आहे. पण या दिवशीही सामना झाला नाही तर ही लढत रद्द करावी लागेल. पण सामना रद्द झाला तर काय, याचे उत्तर समोर आले आहे.

हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर पॉइंट्स टेबलमध्ये कोणाचे किती गुण होते, यावरून फायनलमध्ये कोण जाणार, हे ठरणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये आपण पाहिले तर हैदराबाद आणि राजस्थान यांचे समान गुण आहेत. त्यामुळे यावेळी रन रेट पाहिला जाईल. रन रेटमध्ये हैदराबादने राजस्थानवर बाजी मारली आहे. त्यामुळेच गुण समान असूनही हैदराबादचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या तर राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे पावसामुळे हा सामना रद्द झाला तर हैदराबादचा संघ फायनलमध्ये जाईल आणि राजस्थानच्या संघाला स्पर्धेबाहेर जावे लागेल.