कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे निष्ठावंत व करवीर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार पी. एन. पाटील यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. अशी दुखत प्रतिक्रिया काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केली.
आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनामुळे वडीलधारा मार्गदर्शक गमावला आहे. कोल्हापूरच्या जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं नेतृत्व, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक, अत्यंत अभ्यासू, मनमिळाऊ आणि दूरदृष्टी असणारे नेतृत्व आपण गमावले आहे. पी. एन. पाटील यांच्या निधनामुळे राजकारण, कृषी, सहकार, शिक्षण व क्रीडा क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो.