आ. पी. एन. पाटील माझा उत्कृष्ट मार्गदर्शक : अरुण नरके

कोल्हापुर, प्रतिनिधी : जनमाणसातील दुर्मिळ व्यक्तिमत्व , दिलेला शब्द पाळणारा असा राजा माणूस म्हणजेच आमदार पी. एन. पाटील आज आमच्यातून निघून गेला अशी दुःखद प्रतिक्रिया गोकुळ दूध संस्थेचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी दिली आहे.   

यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले, कार्यकर्त्यांचा पाठीराखा, सहकारी संस्था उत्कृष्टपणे चालवणारा, काँग्रेस (आय) चा अभिमान असणारा असा हा निष्ठावंत नेता होता.  राजीव गांधी व त्यांच्या परिवारावर नितांत प्रेम करणारा तसेच कोल्हापुरात राजीव गांधींचा पुतळा उभा करणारा व विलासराव देशमुखांचा उजवा हात म्हणून खास ओळख असणारा, निष्ठा म्हणजे काय असते हे जगाला दाखवून देणारा, जीवाला जीव देणारा माझा उत्कृष्ट मार्गदर्शक, 48 वर्षांची प्रदीर्घ घट्ट मैत्री असणारा माझा मित्र पी.एन आज आमच्यातून निघून गेला.