9 ते 16 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन

यावर्षी देशात चांगला पाऊस  पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सध्या अंदमान निकोबारमध्ये मान्सूनची एन्ट्री झाली आहे. 31 मे पर्यंत हा मान्सून केरळमध्ये दाखल होईल. 

यावर्षी केरळमधील मान्सूनचे आगमन हे तारखेपूर्वीच म्हणजेच एक जून अगोदरच होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 28 मे ते 3 जून दरम्यान कधीही मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार 9 ते 16 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन होईल. सध्या राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असल्याचं चित्र दिसत आहे. कुठे उन्हाचा तडाखा जाणवत आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.

गेल्या वर्षी  संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला होता. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा पाऊस चांगला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.