गांधीनगर रोडवरील धोकादायक व विनापरवाना होर्डींग वर कारवाई कधी

गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल, उंचगांव, गडमुडशिंगी, चिंचवाड, वळीवडे, गांधीनगर हद्दीतील असणारे मोठ मोठे होल्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिटसह फलकांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये ठेवावी. या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे अधिकारी अरुण जाधव यांना देण्यात आले.

गांधीनगर ही पश्चिम महाराष्टातील सर्वात मोठी कापड व्यापारपेठेसह अन्य जिवनाआवश्यक सर्वच वस्तुंची होलसेल व रिटेल बाजार पेठ असल्याने सर्वच वस्तुंच्या जाहिरातीसाठी तावडे हॉटेल पासून रस्त्याच्या दोन्ही बाजुस मोकळ्या जागेत तर काही ठिकाणी दुकानांच्या इमारतीवर मोठे मोठे जाहिरातीचे फलक मोठया प्रमाणात उभारले आहेत. आगदी छोटया छोटया इमारती वरती मोठ मोठे फलक उभारलेले आहेत. तसेच अगदी रस्त्याच्या लगत ही रिकाम्या जागेत मोठे मोठे फलक उभा केले आहेत. या रस्त्यावरती प्रचंड प्रमाणात गर्दी असते, दुकानातही कामगारांच्या मोठया संख्येसह ग्राहकांची मोठी गर्दी असते.

आता पावसाळ्यापूर्वीं वादळी वारे मोठया प्रमाणात सुरू होते. त्यावेळी कोणताही अपघात होवू नये या संबंधीत मोठ मोठया जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासह त्यांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये असणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामपंचातीला उत्पन्नही मिळू शकते व सदर जाहिरात फलकाचा दर्जा ही तपासणी मध्ये समजू शकतो. पूणे शहरा पाठोपाठ परवाच मुंबई मध्ये जाहिरात होर्डिंग पडून अनेक जणांचा नाहक बळी गेला आहे. यापुर्वी ही याबाबतचे निवेदन ही दिले होते. पण शासन स्तरावरती कोणतीही कारवाई झालेली नाही. मुंबईतील दुर्घटनेनंतर सर्वच महापालिका अर्लट झाल्या असून गांधीनगर रोड वरील सर्वच ग्रामपंचायत दुर्घटनेनंतर अर्लट होणार का ? असा सवाल करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी अधिकाऱ्यांना केला.

वादळी वाऱ्यामधे जर का कोणता अपघात झाला तर संबंधीत दुकानदार मालकांसह सदर हद्दीतील ग्रामपंचायतीवर अपघाताचा गुन्हा नोंद होणेबाबत करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येणार. या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींना कळवून होर्डींगचा दर्जा तपासून धोकादायक व बेकायदेशीर होर्डिंग वर कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमख अवधूत साळोखे, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, समन्वयक विक्रम चौगुले, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर , उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, शरद माळी, दिपक फ्रेमवाला, दिपक अंकल,सुनिल पारपणी, आबा जाधव, बाबूराव पाटील,भूषण चौगुले आदी उपस्थित होते.