कुलस्वामिनीच्या मंदिरात आठ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला. त्यात अनेक सनदी अधिकारीही गुंतले आहेत. म्हणूनच प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आता रद्द केला आहे.
चौकशी समितीने दोषी ठरवलेल्या सनदी अधिकाऱ्यांसह, लिलावदार, मंदिर कर्मचारी, विश्वस्त, आशा १६ दोर्षीवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली जात आहे. निर्धारित वेळेत फौजदारी गुन्हे दाखल न केल्यास हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन झेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी धारशिव शहरात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी हिंदू विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य सुरेश कुलकर्णी, या प्रकरणाचे मूळ तक्रारदार तथा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे किशोर गंगणे, शिरीष कुलकर्णी, राजन बुणगे उपस्थित होते.