पालकमंत्री तुम्ही आम्हा कोल्हापूरवासीयांना फसवलत – माफी मागा

कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी शासनाने जनतेच्या करातून मिळणाऱ्या निधीतून कोल्हापूर शहरातील रस्ते गुळगुळीत व दर्जेदार व्हावेत म्हणून 100 कोटी रूपयांचा निधी दिला होता. ही सर्व रस्ते निवीदाची वादग्रस्त प्रक्रिया कशीबशी लवकरात लवकर पार पाडून नियम धाब्यावर बसवून ठेकेदार निश्चित करण्यात आला.

मिरजकर तिकटी येथे 4/5 महिन्यांपूर्वी  पालकमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत 100 कोटी रूपयांच्या रस्त्यांचा शुभारंभ करत कोल्हापूरकरांसाठी दर्जेदार व गुळगुळीत रस्ते देण्याची भिमगर्जना केली होती, पण आजतागायत कोल्हापूरकरांचा खडयातून प्रवास करण्याचा वनवास संपला नाही. याला पूर्णपणे नियोजनशुन्य व निश्क्रीय कोल्हापूर महापालिका प्रशासनाबरोबरच पालकमंत्रीसुध्दा जबाबदार आहेत.

पालकमंत्र्यांनी कोल्हापूर शहरवासीयांना स्पष्टीकरण द्यावे की, आपण रस्ते कामाचा शुभारंभ करण्याचा आट्टाहास कोणाच्या हाट्टापायी व कशासाठी केला? जर का रस्ते करण्यापूर्वीची महापालिकेची उपाययोजनाच तयार नव्हती तर मग ऐवढया गडबडीत शुभारंभ कशासाठी व कोणाला खुष करण्यासाठी केला? भविष्यात आपले सरकार पडेल आणि आपल्या व आपल्या सरकारमधील सहकाऱ्याच्या हातून ठेकेदाराकडून सर्व काही मिळणारा मानसन्मान मिळणार नाही या भितीपोटी आपण शुभारंभ केला का? निश्क्रीय व नियोजनशून्य प्रशासनाच्या व सरकारच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने लवकरच हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनाप्रमुख संजय पवार यांनी केला आहे.