छोटा हत्ती वाहनातून तब्बल ७ कोटी रुपये पोलिसांनी केले जप्त

आंध्रप्रदेश राज्यातील गोदावरी जिल्ह्यातील नल्लाजर्ला मंडलच्या अनंतपल्ली येथे एका ट्रकनं धडक दिल्याने छोटा हत्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाटा एस  वाहन पलटी झालं आणि ७ बॉक्समधून ७ कोटी रुपये लपवून घेऊन जाण्याचा प्रकार समोर आला आहे.  

स्थानिकांनुसार, या वाहनात पोती भरली होती. त्यात ७ बॉक्स लपवण्यात आले होते. या घटनेची माहिती पोलिसांनी दिली तेव्हा ते घटनास्थळी पोहचले. या वाहनातून पोलिसांनी तब्बल ७ कोटी रुपये जप्त केले. ही घटना वाहन विजयवाडा ते विशाखापट्टनमच्या दिशेने जात होते तेव्हा घडली. या अपघातात टाटा ऐसच्या वाहनचालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला गोपालपुरमच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

याआधीही आंध्र प्रदेशच्या एनटीआर जिल्ह्यात पोलिसांनी चेकिंगवेळी तब्बल ८ कोटी रोकड जप्त करण्यात आली. पोलिसांनी ट्रक आणि पैसे जप्त करत त्यातील चालकासह २ जणांना ताब्यात घेतले. रोकड असलेला हा ट्रक गरिकापाडू चेक पोस्टवर तपासणीवेळी आढळला. ही रक्कम हैदराबादहून गुंटूरला घेऊन जात होते. पोलिसांनी ही रक्कम तपास यंत्रणांकडे सोपवली आणि या प्रकरणाची निवडणूक आयोग चौकशी करत आहे.