कागलमध्ये विज कोसळून सहा जखमी

कागल , प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाउस झाला. कागलमध्ये विज पडून सहाजण जखमी झाले. पण कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटसह पाउस सुरु झाला. दरम्यान शाहूनगर  ता. कागल येथील सतीश गंगाराम कुंभार यांच्या वीटभट्टी शेजारी वीज कोसळून सहा जण जखमी झाले. त्यापैकी तिघांना सिपीआर मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. जखमीची नावे अशी

1-सतीश गंगाराम कुंभार
2-छाया गंगाराम कुंभार
3-साधना सतीश कुंभार
4-नागेश अशोक कासोटे
5-उमेश विजय घाऊट
6-दीपक सदाशिव शिरोळे