तुकडे बंदी कायदा भंग केल्याप्रकरणी दुय्यम निबंधक श्रेणी -१ पन्हाळा यांच्या चौकशीची मागणी

कोल्हापूर , प्रतिनिधी : यवलुज ता . पन्हाळा येथील जमिनीच्या तुकडे बंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी पन्हाळा दुय्यम निबंधक श्रेणी -१ यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना सेवेतून पदच्युत करावे. अशा मागणीचे निवेदन शोभा जयसिंग चौगले यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे .

कायदा ज्ञात असताना देखील पन्हाळा येथील दुय्यम निबंधक अधिकारी हे खुलेआम कायद्याची अवहेलना करून आर्थिक हित संबंध प्रस्तापित करून, खरेदी विक्री दस्त नोंदवतात, त्यामुळे अनेक न्यायालयीनबाबी उपस्थित झालेल्या आहेत. त्यामुळे दुय्यम निबंधक श्रेणी १ पन्हाळा यांनी सन २०२३ मधील व मागील ५ वर्षातील तुकडे बंदी कायद्याचा भंग करून दस्त नोंदवल्या प्रकरणी त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांची २ वर्षाची वेतन वाढ रोखून त्यांना सेवेतून पदच्युत करावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.