छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करवीर तालुका शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने उंचगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच साखर पेढे वाटप करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शिवरायांचा जयघोष करण्यात आला. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, शरद माळी, आबा जाधव, अजित चव्हाण, शिवाजी लोहार आदी उपस्थित होते.