भोगावती : परिते (ता. करवीर ) येथे अंजनी रंगराव पाटील (वय ७७) ही महिला बस अपघातात जागीच ठार झाली . गावातील मुख्य प्रवेश दारावर हि घटना घडली अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती .
अंजनी पाटील या काही कामानिमित्त मुख्य प्रवेश दाराजवळील रस्त्यावरून जात होत्या . त्याच वेळी कोल्हापूरहून राधानगरीकडे जाणाऱ्या बसशी त्या महिलेची जोरात धडक होऊन बसच्या पुढच्या चाकात त्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला . अपघातात अंजनी यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती . गावातील तरुणांनी लगेचच एकेरी वाहतुकीचा मार्ग रिकामा करत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.