दोन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

वाळवा तालुक्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद पेटला होता. साखराळे गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार समोर आला.

या मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झाले. सत्यजित पाटील यांचे बोगस प्रतिनिधी बुथ मध्ये घुसले असल्याचा आरोप धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामुळे काही काळ या मतदार केंद्रावरील मतदान बंद पडले होते. मात्र, त्यानंतर सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक वादावादी याचा हाणामारी देखील झाली, असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर काढले. त्यामुळे तणाव निवळला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मतदान प्रक्रिया दरम्यान होणारा मोठा अनर्थ टाळला आहे. वाळवा तालुक्यात साखराळे गावातील बुथ क्रमांक 62 आणि बुध क्रमांक 63 वर हा प्रकार घडला आहे. सदरील प्रकरणानंतर या केंद्रावर सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली.

🤙 9921334545