देशात आतापर्यंत पर्यंत 25 टक्के मतदान

देशात यंदा लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यापैकी 19 एप्रिलला पहिला टप्पा आणि 26 एप्रिलला दुसरा टप्पा पार पडला आहे. आज (मंगळवार, 7 मे) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. 

यामध्ये इंडिया आघाडी आणि भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चुरस निर्माण झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण 93 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात मतदान होणाऱ्या महाराष्ट्रातील काही मतदारसंघाकडे अवध्या देशाचे लक्ष लागलं आहे.

यामध्ये बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, लातूर, माढा, धाराशिव (उस्मानाबाद), रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सांगली, सातारा व सोलापूर या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

🤙 8080365706