प्रचारासाठी दुर्गापूरला जात असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा जखमी झाल्या. हेलिकॉप्टरमध्ये चढताना त्यांचा पाय घसरला. याआधी 14 मार्च रोजी कोलकाता येथील घरात पडून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. तेव्हा त्यांच्या कपाळावर गंभीर व खोल जखम झाली होती. त्यांना एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना काही टाके पडले होते.
याआधी ममतांना झालेली दुखापत?
- परदेशात प्रवास करताना 27 जून 2023 रोजी त्यांना डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. वर्षाच्या सुरुवातीला हेलिकॉप्टरमधून उतरतानाही त्यांना याच गुडघ्याला दुखापत झाली होती. एसएसकेएम रुग्णालयात त्यांच्या गुडघ्यांची तपासणी करण्यात आली. तपासा दरम्यान ममताच्या डाव्या पायाच्या गुडघ्याच्या लिगामेंटमध्ये दुखापत आढळून आली. त्यांच्या डाव्या सांध्यावरही जखमेच्या खुणा होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला होता, मात्र त्यांनी घरीच उपचार घेतले.
- नंदीग्राममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करताना 10 मार्च 2021 रोजी ममता जखमी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली. यानंतर त्यांना तीन दिवस कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी त्यांच्या पायाला प्लास्टर लावले होते. यानंतर ममता यांनी व्हीलचेअरवर बसून विधानसभा निवडणुकीत प्रचार केला.