पंतप्रधान मोदी श्रीकृष्णासारखे सारथी : शिवसेनेच्या धैर्यशील मानेंचं विधान

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज कोल्हापूरमधील तपोवन मैदानात होत आहे. हातकंणगले महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी सदर सभा पार पडणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेबाबत बोलताना धैर्यशील माने यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. तर मोदी भगवान श्रीकृष्णाप्रमाणे आमचे सारथ्य करत आहेत, असे सांगितले.

काय म्हणाले धैर्यशील माने?

आजवर ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या सभा झाल्या, त्या ठिकाणाचे वातावरण बदलले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत आणि शिवसेनेच्या दोन उमेदवारांचा प्रचार करत असतील तर त्याचा निश्चितच फायदा होईल. तसेच याचा परिणाम महाराष्ट्रातील इतर जागांवरही दिसेल. “पंतप्रधान मोदी हे भाजपाच्या उमेदवारांची सभा घेऊ शकले असते, पण ते घटक पक्षातील उमेदवारांची सभा घेऊन एक संदेश देऊ इच्छित आहेत”, असे धैर्यशील माने म्हणाले.

🤙 8080365706