वाळवा, शिराळा तालुक्याने खंबीरपणे साथ द्यावी : सत्वशील माने

इस्लामपुर/ प्रतिनिधी : गेल्या दहा वर्षात विकास कामासाठी जेवढा निधी आला नाही, त्याच्या शतपटीने निधी खास. धैर्यशील माने यांनी गेल्या पाच वर्षात हातकणंगले लोकसभा मतदार संघात खेचुन आणला आहे. एक नवं व्हिजन डोळ्यासमोर ठेवुन मतदारसंघाचा कायापालट करण्याचा त्यांचा ध्यास आहे. त्यासाठी त्यांना वाळवा तालुक्याने खंबीर साथ देवुन प्रचंड मताधिक्याने निवडुन देण्याचे आवाहन सत्वशील माने यांनी वाळवा व शिराळा तालुक्याच्या संपर्क दौऱ्यात केले. संपर्क दौर्‍यात माजी मंत्री सदाभाऊ खोत, गौरव नायकवडी, भीमराव माने, सागर खोत , स्वरूपराव पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते .


यावेळी सत्वशील माने यांनी वाळवा तालुक्यातील येवलेवाडी, शेने, कलामवाडी, केदारवाडी, मिरजवाडी, मर्दवाडी, तुजारपूर तसेच शिराळा तालुक्यातील कनदूर, पूनवत, कुसाईवाडी, पन्हाळवाडी, शिरये आदी गावातील मतदारांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी गाठीभेटी घेवुन संपर्क यंत्रणा गतिमान केली. तसेच संपर्क दौऱ्यात गावातील तरुण मंडळांनी प्रचारामध्ये उत्फुर्त प्रतिसाद दिला . यावेळी नव्या-जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेवुन सर्वांची मते आजमावुन घेतली .