पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला तर माझं नाव लक्षात ठेवा : रामदास कदम

मुंबई: मोदी, शाहांमुळे भाजपात आलो, पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला तर माझं नाव लक्षात ठेवा असं, म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवक निशाणा साधला आहे.

मोदी, शाहांकडे बघून आम्ही भाजपसोबत आलो, पण पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला, तर माझंही नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा, असं म्हणत रामदास कदमांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.आमचा विश्वासघात होणार नाही, याची दक्षता घ्यावीलोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या फरकाने मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. पण, माझी एकच खंत आहे, महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी मोदी आणि शाह यांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही आलोय. आमचा विश्वासघात होणार नाही, याची त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. सीटींग जागांवरही भाजपची काही मंडळी प्रयत्न करत आहेत. उमेदवारीसाठी तालुक्यात, मतदारसंघात जात आहेत, शिवसेना-राष्ट्रवादीच्या सींटिंग जागांवर जबरदस्तीचा प्रयत्न सुरु आहे.