निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्भय बनो सभा

मुंबई: आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात चाललेल्या हुकूमशीविरोधात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने रत्नागिरीत 11 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता जलतरण तलाव साळवी स्टॉप येथे निर्भय बनो सभेचे आयोजन केले आहे.

यात सामाजिक कार्यकर्ते तसेच विचारवंत व पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी आणि मानवी हक्क, संविधान विश्लेषक व कायदेतज्ज्ञ ॲड.असीम सरोदे हे मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा ‘आम्ही निर्भय रत्नागिरीकर’च्या वतीने होणार आहे अशी माहिती संयोजक अभिजीत हेगशेट्ये यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, दीपक राऊत, विलास कोळपे, नीलेश भोसले उपस्थित होते. यावेळी हेगशेट्ये म्हणाले की, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिलांवरील अन्याय, अल्पसंख्यांक समुदायांच्या अधिकारांचा संकोच, शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या, दलितांवरील अत्याचार, सांविधानिक संस्था व प्रशासकीय यंत्रणा यांवर निर्माण केलेल्या दबाव, डिजिटल माध्यमांवर निर्माण केलेली हुकूमत आदी आजचे कळीचे मुद्दे आहेत; मात्र या मूलभूत प्रश्नांकडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून मंदिर, मस्जिद मुद्दे उपस्थित करून सर्वसामान्य जनतेचे लक्ष वळवले जात आहे