कोल्हापूर: उंचगाव माळीवाडा हायवे पुलाची लांबी, रुंदी व उंची वाढिण्यासाठी गेली सहा महिने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस यांच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करून निवेदने देऊन एक वेळ हायवेचे कामही बंद पाडले. विविध प्रसारमाध्यमांनी ही यावरती बातम्या दिल्या. तरीसुद्धा या कामाबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. व या कामासाठी कोणतीही मंजुरी मिळाली नाही. याभागातील खासदारांनीही याकडे साफ दुर्लक्ष केले. याचा निषेध करण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी “गेले खासदार कुणीकडे” या आशयाचे फलक माळीवाडा पुलाजवळ शिवसेना व काँग्रेस यांच्या वतीने लावण्यात आले.
या फलकाचे अनावरण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी थांबून हा फलक वाचला व प्रशासनाचा निषेध करत आता तरी हायवे प्रशासन व स्थानिक खासदारांना जाग येते का हे पाहूया अशा प्रतिक्रिया दिल्या.
यावेळी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण, दिनकर पोवार, तालुकाप्रमुख विनोद खोत, दिपक पाटील, दिपक रेडेकर, महेश जाधव, युवासेनेचे तालुकाप्रमुख योगेश लोहार, विक्रम चौगुले, विराग करी, बाबुराव पाटील, दिपक पोपटाणी, सुनिल पारपाणी, राहुल मोळे, तुषार पाटील, गुरू माने, संदिप पाटील, श्रीधर कदम, संतोष चौगुले, शरद माळी, विनायक हावळ, अजित चव्हाण, अजित पाटील, दशरथ चौगुले, केरबा माने, सोमनाथ तोडकर, अरविंद शिंदे भागातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.