अंतरवाली सराटी : मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी सध्या उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 24 फेब्रुवारीला राज्यभरात रास्ता रोको करण्याचं आवाहन केलं आहे. ते अंतरवाली सराटी येथे बोलत होते.
सकाळी 10.30 वाजता आंदोलन सुरु करण्यास त्यांनी सांगितलं आहे. मराठा आरक्षणाचा विषय संपल्यानंतर धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आवाज उठवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.”राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको करा. सकाळी 10.30 वाजता आंदोलन सुरु करा. पोलिसांनी परवानगी दिली नाही दिली तरी आंदोलन करा. पण यावेळी जाळपोळ करू नका. शहरातील नागरिकांनी शहरात आणि गावातील लोकांनी सकाळी 10.30 ते 1 आणि ज्यांना जमलं नाही त्यांनी संध्याकाळी 4 ते 7 पर्यत आंदोलन करा. रोज आंदोलन करा. पण कुणाचीही गाडी फोडू नका. जाळू नका, पण पुढे जाऊ देऊ नका. आंदोलनाचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ देऊ नका,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.