कोल्हापूर : शहरातील रहिवासी असलेल्या दिव्यांगांसाठी महानगरपालिका दरवर्षी विविध उपक्रम राबवून दिव्यांगांना सर्वतोपरी मदत करत असते. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील दिव्यांगांसाठी दोन दिवसाचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर बुधवार व गुरुवार, दि.२१ व २२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात घेतले जात आहे. यामध्ये दिव्यांगांना मोफत आरोग्य तपासणीअंती आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात येणार आहे. तरी शहरातील दिव्यांगांनी आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.