अनेक जणांना सकाळी उठल्यावर लगेच चहा पितात. जर तुम्हाला रिकाम्या पोटी चहा प्यायची सवय असेल तर ही महिती वाचा.
चहा अॅसिडीक असतो. रिकाम्या किंवा उपाशी पोटी चहा प्यायल्याने हार्ट बर्नची समस्या होऊ शकते. तसेच तुम्हाला अॅसिडीटी देखील होऊ शकते. त्यामुळे चहा किंवा कॉफी ही सकाळी रिकाम्या पोटी पिणे टाळावे. चहा किंवा कॉफी अॅसिडीक असल्याने रिकाम्या पोटी चहा पिल्याने शरिराचे अॅसिडीक बॅलेन्स बिघडते. त्यामुळे तुम्हाला अॅसिडीटी होऊ शकते. त्यामुळे उपाशी पोटी चहा पिऊ नये.
चहा किंवा कॉफी जर तुम्हाला प्यायची असेल तर जेवणानंतर किंवा नाश्ता झाल्यानंतर तुम्ही चहा किंवा कॉफी पिऊ शकता. चहासोबत तुम्ही बिस्कीट खाऊ शकता. त्यामुळे तुमची भूक देखील कमी होईल.