22 मार्चला आयपीएलचा 17 वा सीझन

मुंबई: आयपीएलचा 17 वा सीझन 22 मार्च ते 26 मे दरम्यान खेळवला जाणार आहे. अशी माहिती एका अहवालात समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएल 2024 च्या तारखा निश्चित केल्या आहेत. या अंतर्गत 22 मार्च रोजी सलामीचा सामना तर 26 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. मात्र, यावर अंतिम मंजुरीची शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. जर हे वेळापत्रक अंतिम ठरले तर त्यानुसार ही स्पर्धा टी20 विश्वचषकाच्या अवघ्या 5 दिवस आधी संपेल.

टी20 विश्वचषक 2024 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसमध्ये सुरू होणार आहे. मात्र, भारतीय संघाला पहिला सामना 5 जूनला खेळायचा आहे.आयपीएलच्या या वेळापत्रकाचा या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो. खरे तर आयपीएल खेळायचे आहे, तेव्हा लोकसभेच्या निवडणुकाही भारतभर होणार आहेत. वेगवेगळ्या टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुका मार्चपासून सुरू होऊन मेपर्यंत चालणार आहेत. अशा स्थितीत बीसीसीआय आधी आयपीएलच्या वेळापत्रकावर सरकारशी चर्चा करण्याची शक्यता आहे.