मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण कसे देणार : महाविकास आघाडीचा सवाल

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आजपर्यंत जोरदार आंदोलने झाली. सगे सोयरे अधिसूचना स्पष्ट व्हावी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाचं शस्त्र उगारले आहे.

गेल्या दहा दिवसांपासून जरांगे पाटील आमरण उपोषण करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यात येत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुख्यमंत्री, विधान सभा अध्यक्ष , विधान परिषद उपसभापती यांना पत्र लिहिले आहे. या विशेष अधिवेशना बाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नसल्यामुळे मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण कसे देणार ? ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसे देणार? असे सवाल या पत्राद्वारे विचारण्यात आले. असून सगे सोयरे अधिसूचना बाबत स्पष्टता द्यावी अशी मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.