कोल्हापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती असल्यामुळे भोगावती सहकारी साखर कारखाना परिवाराने प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही अगदी अल्प काळात शिवमहोत्सवाचे नेटके नियोजन केले होते. त्यामुळे अखंड भोगावती साखर परिवार शिवमय झाला होता.
आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन कारखान्याचे जेष्ठ संचालक मा . कृष्णराव पाटीलसो यांच्या हस्ते तर पालखीचे पूजन ज्येष्ठ संचालक मा . केरबा भाऊ पाटीलसो यांच्या हस्ते संपन्न झाले .राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन तसेच कारखान्याचे संस्थापक कै .दादासाहेब कौलवकर यांच्या पुतळ्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन मा.शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी निघालेल्या शोभायात्रेदरम्यान भोगावती हायस्कूलच्या मुलींचे लेझीम पथक व मर्दानी खेळांनी शोभायात्रेला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली.
कमांडो करीयर अकादमी चे सागर पाटील व सहकाऱ्यांनी पन्हाळगडावरून शिवज्योत आणली होती .कारखान्याच्या सांस्कृतिक हॉलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात चेअरमन मा शिवाजीराव पाटील, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा डॉ .जालंदर , प्रा पवन पाटील व कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून समृद्ध शिवराज्याचे स्मरण केले. विराज पोवारने हुबेहुब साकारलेले शिवाजी महाराज विराज ढेरे यांचे पोवाडे, आरे येथील हरेश्वर विद्यालयाच्या शिवकन्यांनी सादर केलेले मर्दानी खेळ व दांडपट्ट्याने सर्वांची मने जिंकली.
भोगावती हायस्कूल , म्हाळुंगे विद्या मंदिर व राजर्षि शाहू हायस्कूल म्हाळुंगे, न्यू हायस्कूल देवाळे ,राजर्षि शाहू पब्लिक स्कूल भोगावती यांचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सादर केलेले तुळजाभवानीचे गीत ,ललाटी भंडार जोगवागीत ,पोवाडे, देशभक्तीपर गीते , रिया गणेशाचार्य हिची लावणी,भोगावती कारखान्याचे कर्मचारी बाजीराव चौगले व भोगावती हायस्कूलचे मुख्याध्यापक नेताजी डोंगळे यांनी सादर केलेले सादर केलेले गर्जा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत या सर्व कार्यक्रमानी उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले . भोगावती परिवार व परिसर शिवमय झाला . या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी मुख्याद्यापक व शिक्षकांना भगवान श्री दत्तगुरुंची मुर्ती भेट देऊन भोगावती साखर परिवाराने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली . कारखान्याचे चेअरमन मा. शिवाजीराव पाटील, व्हा . चेअरमन मा. राजाराम कवडे व सर्व संचालक मंडळाने केलेल्या नाविन्य पुर्ण नियोजन केलें होतें.