कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसचे जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न

कोल्हापूर : जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे १८ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय महिला काँग्रेस जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार मा. सतेज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उत्साहात पार पडले. चार सत्रांमध्ये हे शिबिर संपन्न असून शिबिरापूर्वी ध्वजारोहण झाले.

शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर शहराच्या आमदार जयश्रीताई जाधव उपस्थित होत्या. शिबिराची सुरुवात उपस्थित महिलांच्या हस्ते मोदी सरकारच्या आश्वासनांचे फुगे फोडून व त्यातील वास्तवदर्शक माहिती फलक समोर आणून अभिनव पद्धतीने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरलाताई पाटील यांनी केले व भूमिका मांडली. पहिले सत्र आजचे स्त्री प्रश्न आणि मानसिकता या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या तनुजा शिपुरकर यांची मांडणी झाली. त्यानंतर दुसरे सत्र लोकशाहीत महिलांची भूमिका आणि आव्हाने यावर चर्चा झाली तिसऱ्या सत्रामध्ये ‘सत्तेची चाल- पावर वॉक’ ऍक्टिव्हिटी झाली चौथे सत्र ‘ जवाहर ते मनमोहन : काँग्रेस प्रधानमंत्र्यांच्या लोककल्याणकारी योजना’ यावर झाले या सत्रा मध्ये शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य ऍड. अभिषेक मिठारी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सद्यस्थितीच्या राजकीय चित्रावर भाष्य करणारे स्टँडअप कॉमेडी शाहीर रणजित यांनी सादर केले. समारोप महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव भारतीताई पवार यांनी केला.

यावेळी संध्याताई घोटणे , सुलोचना नाईकवडे, मंगला खुडे , चंदाताई बेलेकरसविता पाटील कुंभोज, बिस्मिल्ला गैबानी इचलकरंजी, गौरी मुसळे, रूपाली चव्हाण, संगीता कांबळे, उज्वला चौगुले, वैशाली जाधव सुमन ढेरे दिपाली आवळे अलका सलगर, राजश्री देसाई, शुभांगी जाधव यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.