
कोल्हापूर :- जेष्ठ नेते कॉम्रेड गोंविदाराव पानसरे यांचा लोकार्पण सोहळा अभूतपूर्व व्हावा. याकरीता कार्यकर्त्यांसह भागातील नगरसेवकांनी नागरीकांच्या घरोघरी जावून सोहळ्यास आवार्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन करावे. अशा सुचना आमदार सतेज पाटील यांनी केल्या.
प्रतिभानगरातील वि.स.खांडेकर प्रशाला प्रांगणातील शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मारकाच्या उद्या, मंगळवारी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सांयकाळी झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, हा सोहळा अभूतपुर्व व्हावा. सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मित्रमंडळी, भागातील सर्व नागरीकांना वैयक्तिक गाठीभेटी घेवून निमंत्रण द्यावे. यावेळी झालेल्या बैठकीत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार डी. राजा, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, डॉ. भालचंद्र कानगो आदी मान्यवरांचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. त्यामुळे झेड सुरक्षा व्यवस्था आहे. दरम्यान सभास्थळ, व्यासपीठ आणि स्मारकाची पाहणी आमदार पाटील यांनी केली. विशेष म्हणजे शहिद कॉम्रेड पानसरे यांच्या कुटूंबियातील सदस्यांची विचारपूस करीत सोङळ्यास येण्याचे निमंत्रणही आमदार पाटील यांनी दिली.
यावेळी आमदार जयश्री जाधव, भाकपचे ज्येष्ठ नेते दिलीप पवार, जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र कांबळे, बॅक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव परुळेकर, आयटकचे एस.बी.पाटील, दिलदार मुजावर, सर्जेराव पाटील, उमेश कदम, उमेश पानसरे, संदीप पाटील , अशोक सुतार, अरुण देवकुळे, उदय धारवाडे, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, मधुकर रामाणे, लालासाहेब भोसले, सर्जेराव साळोखे आदी उपस्थित होते.