मराठा आरक्षणाचा मसुदा तयार

मुंबई: मराठा आरक्षणाबाबतची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणाचा मसुदा तयार झाला असून मराठा समाजाला १३ टक्के आरक्षण मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कॅबिनेटमध्ये आरक्षणाच्या या मसुद्याला मंजुरी मिळणार आहे. तर मराठा आरक्षणासंदर्भात तयार करण्यात आलेल्या या मसुद्याकरता निवृत्त न्यायमूर्तींचीही मदत घेतली असल्याचे सांगितले जात आहे. तर संपूर्ण राज्यभरात ३२ टक्के मराठा समाज आहे, अशी नोंद आहे. तर कुणबी समाज वगळून उर्वरित मराठा ३२ टक्के असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलंय. दरम्यान, मराठा आरक्षणाचा नवा कायदा हा कोर्टात टिकणार असल्याचं मत सरकारी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

🤙 9921334545