कोल्हापूर : महाराष्ट्र शासनामार्फत शासन अनुदानातून मंजूर महत्वकांक्षी प्रकल्पांचा व महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचा लोकार्पन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
हा लोकार्पन व उद्घाटन सोहळा शनिवार, दि17 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1.00 वा संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे होणार आहे.यामध्ये काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) रस्ते प्रकल्प, स्वच्छ भारत अंतर्गत उपलब्ध मशिनरीचे खरेदी, लोक सहभागातून विकसित घरफाळा संगणकीय प्रणाली, रंकाळा तलाव जतन व संवर्धन, रंकाळा येथे बॉटनिकल गार्डन (मा. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे जेष्ठ नागरी विरंगुळा केंद्र), श्री महालक्ष्मी मंदीराभोवती ऐतिहासिक प्रकारचे आकर्षक व ध्वनीयुक्त विद्युत खांब बसविणे., पंचगंगा घाट येथील विकासकामे व संवर्धन, पंचगंगा स्मशानभूमी विकसित करणे, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मृती व स्फुर्ती सदन बांधणे, केशवराव भोसले नाट्यगृह व शाहू खासबाग मैदान जतन व संवर्धन करणे दुसरा टप्पा, राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्थळ विकसीत करणे, महालक्ष्मी मंदीरा शेजारील सांडपाणी निर्गती करीता भुयारी गटारीचे काम करणे, महात्मा गांधी मैदान येथील पर्जन्य जल वाहिनीचे काम यांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.