बारातमती लोकसभेमध्ये नंणद भावजय होणार लढत ?

मुंबई: राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दोन गट पडल्याने आता लोकसभा निवडणूकही अटीतटीची होणार आहे. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना टक्कर देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मोठी खेळी खेळण्यात येणार आहे. बारामतीत लोकसभेमध्ये नणंद-भावजयीत लढत होण्याची चिन्हे आहेत.

बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवारही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देणार असल्याची शक्यता आहे. सुळे यांच्या विकास रथाला सुनेत्रा पवार यांनी विकास रथातून उत्तर देणार आहेत, अशा चर्चा रंगत आहेत. सुप्रिया सुळे यांचा विकास रथ आधीपासून मतदारसंघात फिरतोय. त्याचबरोबर आता गेल्या काहि दिवसांपासून सुनेत्रा पवार यांचाही विकास रथ बारामती मतदारसंघात फिरताना दिसत आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, आता सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या कामाचा आढावा घेणारा व प्रचार करणारा विकासाचा रथ मतदारसंघात फिरताना दिसत आहे. गुरुवारी संध्याकाळी पूजा झाल्यानंतर हा बारामती आणि इतर गावांमध्ये रथ फिरताना दिसत आहे. त्यामुळं नणंद-भावजयमध्ये हा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.

🤙 8080365706