कोल्हापूर : प्रायव्हेट हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी वरील विचार प्रशालेचे माजी विद्यार्थी व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजचे अध्यक्ष चंदन मिरजकर यांनी व्यक्त केले.शालेय वयातच भविष्यातील आपल्या करिअरचा पाया मजबूत करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली मनाची ताकद आणि बौद्धिक क्षमता समजून घेऊन आपल्या आवडीनुसार करिअर निश्चित करावे त्यासाठी योग्यता चाचणी करून घ्यावी. असे मत त्यांनी मांडले.
२०२३ – २०२४ या शैक्षणिक वर्षातील कला, क्रीडा, एनसीसी, स्काऊट आधी विविध शालेय व सहशालेय उपक्रमात आपला ठसा उमटवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन अरुण डोंगरे होते. कार्यक्रमाची सुरवात कै.पूज्य विभूते गुरूजी , गुरूवर्य कै.अ.वि.जोशी ,सरस्वतीपूजन व दीपप्रज्ज्वलनाने झाली. शिक्षक सीताराम जाधव यांच्या हार्मोनियमच्या साथीवर विद्यार्थिनींनी गायलेल्या गीताने मान्यवरांचे स्वागत झाले.कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्तविक मुख्याध्यापिका सौ.व्ही.एल. डेळेकर यांनी केले.अतिथींचा परिचय जे.एस.जोशी यांनी केला.
जिमखाना प्रमुख एस आर गानबावले यांनी जिमखाना अहवाल सादर केला.प्रमुख अतिथी आणि मान्यवर यांचे हस्ते विविध पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
पारितोषिकांच्या यादीचे वाचन कुमारी आर.आर.नाईक व रोहित कुंभार यांनी केले आभार पर्यवेक्षक पी.एम. जोशी यांनी तर सूत्रसंचालन सौ.एम. एम. निगुडकर यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेच्या नियामक मंडळाचे व्हाईस चेअरमन उदय सांगवडेकर नियामक मंडळ सदस्य प्रकाश मेहता, संस्थेचे कोषाध्यक्ष जी.एस. जांभळीकर, माजी शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.