राज्यांत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान

कोल्हापूर : सध्या राज्यामध्ये दि. १ जानेवारी ते दि. १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियान राबविण्यात येत आहे. या कालावधीमध्ये राज्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हे उपक्रम यशस्वी करणाऱ्या शाळांना भरघोस बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे.

या अभियानाअंतर्गत शासनामार्फत आज दुपारी ३ वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून प्रेरक वक्ते गौर गोपाल दास यांचे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचे संकल्पक अमित हुक्केरीकर यांनी यावेळी प्रेरणादायी मुलाखत घेतली. ऑनलाईन स्वरूपातील या संवाद सत्राचे थेट प्रसारण YouTube द्वारे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीम. लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता ठोंबरे यांनी सर्वांना शाल व गुलाबपुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले.

या संवाद सत्रास महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण उपसंचालक महेश चोथे, शिक्षणाधिकारी माध्यमिक एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक मीना शेंडकर, एसएससी बोर्डचे सचिव सुभाष चौगुले, सहसचिव डी एस पवार, प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी एस के यादव, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, श्रीमती लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिर शाळेतून ऑनलाईन सहभागी झाले. या शाळेत ऑनलाईन प्रक्षेपण दाखवण्यासाठी नचिकेत सरनाईक, शांताराम सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.