महाराष्ट्र क्लायमेट रिझल्ट डेव्हलपमेंट प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या सदस्यांचा बुधवारी कोल्हापूर दौरा

कोल्हापूर: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी नियंत्रण करणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवणे यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. तत्वत: हा प्रकल्प ३२०० कोटींचा आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने जागतिक बँकेचे सदस्यांची समिती आज बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहे.

हा प्रकल्प मित्र संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असून संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, संबधित प्रशासकीय अधिकारी व वर्ल्ड बँक प्रतिनिधी मिळून पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

दुपारी १.०० वाजता समितीचे कोल्हापुरात आगमन.१.३० वाजता : प्रयाग चिखलीसह पुरग्रस्त भागांची पाहणी२.०० जोतिबा डोंगरावरील डोंगर खचणाऱ्या गायमुख परिसराची पाहणी३.३० : दूधाळी परिसरात पाहणी४.०० राजाराम बंधारा येथे पाहणीसायंकाळी ५.३० वाजता : जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि सांगलीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक