बहिरेश्वर : करवीर तालुक्यातील मौजे बहिरेश्वर ता करवीर येथे स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार पी एन पाटील यांनी (45/15 आमदार फंडातून) नागरनाथ मंदिर ते बापु काशिद झापापर्यंत च्या ४५० मीटर रस्ता रूंदीकरण,खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी 20 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे या कामाचा शुभारंभ लोकनियुक्त सरपंच सौ वंदना निवृत्ती दिंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी उपसरपंच सौ शूभांगी दिंडे सर्व सदस्य,सदस्या गावातील ज्येष्ठ नेते, तरुण मंडळ, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.या रस्त्यासाठी आमदार पी एन पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.रस्ता रूंदीकरणाने शेतक-यांतुन व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करण्यात येत आहे.