पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. वागळे यांनी जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण होणारे वक्तव्य करून लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही अवमान केल्याचे देवधर यांनी तक्रारीत म्हटलं आहे. वागळे यांनी सोशल मीडियावर ‘एका दंगेखोराने दुसर्या दंगेखोराला दिलेला पुरस्कार’ अशा स्वरूपाचे लिखाण केले होते.