शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय मोहिम राबविणार

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना देशभरात लोकप्रिय ठरली आहे. शेतकऱ्यांना या योजनेत दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. दरम्यान अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद झाला आहे. अशा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून, अडचण सोडविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय या खास मोहिम राबविणार आहे.

येत्या 12 फेब्रुवारीपासून ही खास मोहिम राबविण्यात येणार आहे. कृषी मंत्रालयानुसार, 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल. देशभरातील 4 लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे.