आमदार सतेज पाटील यांनी केली कॉम्रेड दिवंगत गोविंदराव पानसरे स्मारकाच्या कामाची पाहणी केली

कोल्हापूर: आमदार सतेज पाटील यांनी प्रतिभानगर येथील दिवंगत ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मारकाच्या कामाची पाहणी केली. येत्या 20 फेब्रुवारी रोजी कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मृतीदिनी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगीतले.

कोल्हापुरातील प्रतिभानगर येथील महानगरपालिकेच्या वि. स. खांडेकर शाळेजवळ अडीच हजार चौरस फुटांच्या जागेत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे स्मारक उभारण्यात येत असलेल्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी आमदार सतेज पाटील यांनी 35 लाख रुपयांचा तर महापालिकेने चाळीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाची उर्वरीत कामे तात्काळ पूर्ण करावीत. अशा सूचना माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी महापालिकेच्या अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर रवींद्र जोशी आणि आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांना दिल्या. लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता रामभाई सामाणी हॉल उद्यमनगर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी आमदार पाटील यांनी स्मारक समितीच्या प्रतिनिधीसह प्रतिभानगर येथील स्मारकाच्या कामाची पाहणी केली. यावेळी कॉम्रेड दिलीप पवार,कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, महानगरपालिकेचे उपशहर अभियंता सतीश फप्पे, महादेव फुलारी, काकासो पाटील, डॉ अजित राजीगरे, सर्जेराव साळोखे, उमेश पोवार, समीर कुलकर्णी, विजय सुर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .