
कोल्हापूर : ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज कोल्हापुरात आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात जात दर्शन घेतलं. यावेळी अंबाबाई ही शक्ती देवता आहे आणि ऊर्जेची देवता आहे. शिवसेना आणि शिवसैनिकाला ऊर्जा प्राप्त होऊन या महाराष्ट्रात महिषासुराच्या अवलाद जन्मले आहेत. त्यांचं निर्धालन करण्याची शक्ती आमच्या मनामध्ये देव द्यावी. अशी अंबाबाईची चरणी प्रार्थना केलेली आहे, असं दानवे यांनी सांगितलं.

शिंदे सरकारच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर टीका केली आहे. शासन आपल्या दारी हे केवळ सरकारी यंत्रणा आणि जाहिरातींचा वापर करून केलेली शो बाजी आहे. राज्यात अनेक ठिकाणी जनता दरबार घेत आहे. शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केवळ भास आणि बोगस कार्यक्रम आहे, असं अंबादास दानवे म्हणालेत.उद्धव ठाकरे यांना इशारा देण्याची धमक एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटात नाही. त्यांना इशारा द्यायचा असता तर ते समोरासमोर येऊन बोलले असते. गद्दार लोकांना नाक नसतं आणि तोंडही नसतं.
रेल्वे विमान सुरू करण्यासाठी जबाबदारी आहे. एखादी रेल्वे सुरू केले म्हणजे देशाचा परिवर्तन झालं का? आज देशाचे आर्थिक स्थिती काय आहे हे त्यांनी पाहावं. मागच्या एक वर्षात अमृत काळाचा एक थेंब देखील पडला आहे का? हे त्यांनी विचार करावा, असं अंबादास दानवे म्हणालेत.