मुंबई डबेवाला संघटनेचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा

मुंबई : मराठ्यांच्या जीवावर मोठे झालात आणि मराठ्यांच्याच आरक्षणाला विरोध करता, बस झालं, आता यापुढे तुम्हाला आमच्या जीवावर मोठं होऊ देणार नाही. मी जिवंत असेपर्यंत मराठ्यांच्या जिवावर कोणालाच मोठं होऊ देणार नाही. जे आमच्या बाजूने बोलतात.

आमच्या गोरगरीब लेकरांच्या कल्याणाचा विचार करतात, त्यांचाच आम्ही देखील विचार करू, असा घणाघात मनोज जरांगे यांनी विरोधकांवर केला. तर कामोठे या ठिकाणी मुंबई डबेवाले असोसिएशनच्या वतीने जरांगे यांना पाठिंबा देण्यात आला.

जरांगे यावेळी बोलताना म्हणाले की, विरोधकांना मी एकटाच काफी आहे, त्यांना मी पुरून उरेल, जो माझ्याविरुद्ध बोलतो त्याच्यात दम असेल तर त्यांनी समोर येऊन दाखवावं, त्याला पुरून उरेल. मला त्याच्या किती दम आहे, हेच पाहायचं आहे, असे म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली . तर 10 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहे.

🤙 9921334545