पंचगंगा नदीच्या दोन्ही तीरावर उपसाबंदी

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या दोन्ही तीरावरील भागात रब्बी हंगाम 2023-2024 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणा-या उपसा यंत्रावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी उपसाबंदीचे आदेश जारी केले आहेत.

पंचगंगा नदी – कार्यवाहीचा भाग- पंचगंगा नदीवरील ‍शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याखाली ते शिरोळ कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंत दोन्ही तिरावरील भागावर नमूद केलेल्या नदीवरील भागात ‍मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात दिनांक 6 ते 7 फेब्रुवारी या दोन दिवसांसाठी उपसाबंदी करण्यात आली आहे.

उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवाना धारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणा-या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही. हा आदेश महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976, कलम 51(3) व 97 मधील तरतूदीनुसार असलेल्या अधिकारान्वये देण्यात आला आहे.