शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह पाटील तर उपाध्यक्षपदी राजसिंह शेळके

कोल्हापूर( प्रतिनिधी) : शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात आज (सोमवारी) अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडीसाठी संचालकांची बैठक झाली. यामध्ये संघाच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह पाटील (मुरगूडकर) तर उपाध्यक्षपदी राजसिंह शेळके यांची निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी निळकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली निवडी पार पडल्या.

अध्यक्षपदासाठी पाटील यांचे नाव संचालक जी. डी. पाटील यांनी सुचविले. संचालक अमरसिंह माने यांनी अनुमोदन दिले.उपाध्यक्षपदासाठी शेळके यांचे नाव संचालक दत्तात्रय राणे यांनी सुचविले. संचालक सर्जेराव यांनी अनुमोदन दिले. बैठकीला संघाचे संचालक उपस्थित होते.

  अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष शेळके हे शेतकरी संघावर  प्रथमच संचालक म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. प्रवीणसिंह पाटील यांनी यापूर्वी मुरगुडचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तर शेळके आणि महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड ही एक वर्षासाठी राहणार आहे. या  निवडीनंतर शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष युवराज पाटील यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष - उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी संचालक अजित मोहिते, आनंदा बनकर, दत्ताजीराव वारके, अप्पासो चौगुले, सुभाष जामदार, विजयसिंह युवराज पाटील, बाबासाहेब शिंदे, प्रधान पाटील, जयकुमार मुनोळी, परशुराम कांबळे, सुनील मोदी, रोहिणी

धनाजी पाटील, अपर्णा अमित पाटील आदी उपस्थित होते.