मुंबई: आज रविवार आहे, तर कोंबडी वडे झालेच पाहिजे. कोंबडी चोराची पिसे तुम्हीच काढलीत, अशी अप्रत्यक्ष टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्री मंत्री नारायण राणे यांच्यावर केली आहे.उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गातूनच त्यांच्यावर तोफ डागली. उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्ग येथील सावंतवाडीत आज जनसंपर्क सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केल आहे.
नारायण राणेंवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज रविवार आहे, कोंबडी वडे तर झालेच पाहिजेत ना. आता त्याचे जे काही करायचे होते पिसे काढायची ती तुम्हीच काढलेली आहात. कोंबडी चोराची पिसे तुम्हीच काढली आहेत. आणखीन काही नवीन उगवली असतील तर ती पण उपटून टाका आणि मी इथे आलोय उगाच माझे तोंड खराब करून घ्यायला आलेलो नाही. “, अशी टीका केली आहे.