हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून सिद्धी जाधवची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अंतर विद्यापीठ अखिल भारतीय महिला हॉकी स्पर्धेचा शुभारंभ ध्यानचंद हॉकी स्टेडियम पिंपरी चिंचवड पुणे येथे नुकताच संपन्न झाला. सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून सिद्धी जाधव यांची निवड झाली होती. तिला या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रमुख पंच म्हणून संधी मिळाली आहे.

या स्पर्धेत संपूर्ण भारतातून पटियाला,ग्वालियर,रांची,मद्रास,अमृतसर,रोहतर कालिकत,कोईमतुर चंदिगड ठिकाणाहून संघ आले होते.
सिद्धी हिला हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष कृष्णप्रकाश (आयपीएस) सेक्रेटरी मनीष आनंद,मनोज भोरे हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सुरेखा पाटील सेक्रेटरी मोहन भांडवले हॉकी इंडियाचे दिग्विजय नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.