कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली करण्यात आली असून यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुल रेखावार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीपासूनच त्यांची वादग्रस्त कारकीर्द लक्षवेधी ठरली आहे.कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांना एक वर्षांची मुदतवाढ मिळाली होती.एक ना अनेक आरोप आणि विधानांमुळे रेखावार यांची कारकीर्द चर्चेत राहिली.
भाजपच्या पदाधिकार्यांकडून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या बदलीची मागणी करण्यात आली होती. अशातच त्यांची बदली पुढील आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.कोल्हापूरचा पुढील जिल्हाधिकारी कोण? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर बुधवारी (ता.31)रेखावार यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले.