बहिरेश्वर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील मौजे म्हारुळ ता करवीर येथील शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार पी एन पाटील यांच्या उपस्थितीत काॅग्रेस पक्षात प्रवेश केला…कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सिंग्राप्पा धोंडी पाटील होते.
सरपंच श्रीमती शालाबाई गूरव व उपसरपंच राजाराम कुंभार यांनी आमदार पी एन पाटील यांचे पूष्पगूच्छ देवून स्वागत केले.तद्नंतर रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला व त्यानंतर दलित वस्ती येथील समाज मंदिराचे उद्घाटन करण्यात आले…
आमदार पी एन पाटील यांनी आमदार फंडातून म्हारुळ गावातील अंतर्गत रस्ते व दलित समाजातील सामाजिक मंदीर बांधकामासाठी 25 लाख निधी उपलब्ध करून दिला या कामाचे उद्घाटन प्रसंगी गावातील छत्रपती संभाजी तरुण मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार पी एन पाटील यांच्या उपस्थितीत काॅग्रेस पक्षात प्रवेश केला…
यावेळी माजी उपसरपंच सरदार बाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक केले,तर माजी ग्रामसेवक एन के पाटील,भरत सुतार, महादेव पाटील आदींनी आपली मनोगते व्यक्त केली…
करवीर पंचायत समिती चे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी,गोकुळचे विद्यमान संचालक बाळासाहेब खाडे यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली..
माजी ग्रामसेवक एन के पाटील यांनी आमदार पाटील यांनी दिलेल्या फंडाबद्दल त्यांचे आभार मानले व नळपाणी पुरवठा योजनेमुळे गावातील रस्ता खराब झाला आहे तो नवीन करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.
भरत सूतार यांनी आपल्या मनोगतातून आमदार पी एन पाटील यांचा कामाचा धडका पाहून आम्ही पक्ष प्रवेश केला असलेच सांगितले.
गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून आमदार पाटील व आपल्यात मध्यंतरी दुरावा निर्माण झाला होता पण तो दुरावा आता राहिला नसलेच नमूद केले..
तसेच म्हारुळ करांनी स्टेजवर चढण्यासाठी केलेली रचना आमदारांना दाखवून दिली..व म्हणाले म्हारुळ कर फार हूशार आहेत स्टेजवर सहज चढता आले पण स्टेजवरून उतरायला काय जमणार नाही अशी रचना जाणून बूजुन केली आहे का ?अशी मिश्कील टिपणी करताच सगळीकड हास्यकल्लोळ माजला.
ते पुढे म्हणाले आमच्यातील काही मंडळी ई डी च्या धाकांनी भाजपात गेली आहेत ती ही काही कालांतराने स्वगृही परत येतील..तसेच इथुन पुढे आमच्यातील कोणीही भाजपाला नतमस्तक होणार नाही.
आमदार पी एन पाटील यांनी छत्रपती संभाजी तरुण मंडळाचे स्कार्फ व गुलाब पूष्प देवून स्वागत केले .. काॅग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कोणावरही दुजाभाव केला जाणार नाही.. त्यांचा मानसन्मान राखला जाईल..तुम्ही कोणतेही काम आपल्याकड घेवून या ते पुर्ण केले जाईल असे आश्वासन दिले..यावेळी सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली…
यावेळी त्यांनी भाजपावर सडकून टिका ही केली.ई डी चा धाक दाखवून प्रत्येकाला भाजप प्रवेश करण्यासाठी दडपण आणल जातंय …भाजप सरकारने 400रूपयाला मिळणार सिलेंडर 1000रु केले, पेट्रोल, डिझेल दरात भरमसाठ वाढ, उद्योजकांना कर्जमाफी यातून देशाची प्रगती न करता देश देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला जात असलेच आरोप आमदार पाटील यांनी केला…
,श्री रामप्रभु हे फक्त आपलेच असलेच पंतप्रधान जगाला दाखवून देत आहेत..श्री राम हे आमचेही आहेत त्यांनी राजकारणासाठी त्यांचाही वापर सूरू केला आहे .
राममंदिराचे काम अपूर्ण असताना देखील मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण योग्य नसलेच काही पंडितांनी सांगितलं असतानाही पूढील राजकारण करण्यासाठी गडबडीत कार्यक्रम उरकून घेतला असलेच पाटील म्हणाले…
याप्रसंगी काॅग्रेस पक्षाचे सरचिटणीस बाजीराव खाडे,माजी जि प सदस्य सुभाष सातपूते,माजी पं स सदस्या अर्चना खाडे,माजी सरपंच सुर्यकांत दिंडे,रघूनाथ वरुटे,पी आर पाटील,प्रा टी एल पाटील,तसेच बहिरेश्वर,आमशी,गणेवाडी आदी गावातील मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती संभाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष रंगराव पाटील, उपाध्यक्ष नामदेव चौगले,शिवाजी आरेकर, प्रकाश आरेकर, सर्जेराव पाटील,अतूल मांडरेकर, तुळशीदास कुंभार, पैलवान गणपती पाटील,भैरु पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…आभार बाजीराव धोंडी पाटील यांनी मानले…