भारताच्या या खेळाडूला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात  नेण्याची वेळ…

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू मयंक अग्रवाल याची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अगरतलावरून फ्लाईट सूरतला जात होती.

या प्लेनमध्ये बसण्यापूर्वी मयंक अग्रवाल अस्वस्थ वा़टू लागलं.त्याला श्वास घेताना त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली.मयंक अग्रवालला आयसीयूत भरती करण्यात आलं असून त्याची तब्येत ठीक असल्याचं सांगण्यात येत आहे.

मयंक अग्रवालकडे कर्नाटक संघाचं नेतृत्व आहे. 32 वर्षीय सलामीवीर मयंक अग्रवाल गेल्या 2 वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे.सध्याच्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. मयंकने रणजीतील सुरुवात खराब झाली आणि पंजाबविरुद्धच्या दोन्ही डावात त्याला खातेही उघडता आले नाही.

यानंतर त्याने गुजरात आणि गोव्याविरुद्ध सलग 2 सामन्यात शतके ठोकली.मयंक अग्रवालने 26 ते 29 जानेवारीदरम्यान त्रिपुराविरुद्ध रणजी सामना खेळला होता. यात 51 आणि 17 धावांची खेळी केली होती. हा सामना कर्नाटकने 29 धावांनी जिंकला होता. या सामन्यानंतर मयंकला परत यायचं होतं.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मयंक अग्रवाल याच्यासोबत नेमकं असं का झालं याचा तपास करत आहेत. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव शाबीर तारापोर यांनी सांगितलं की, “आम्हाला या घटनेबाबत माहिती मिळाली असून नेमकं काय घडलं हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे अर्धवट माहिती देण्यात काहीच अर्थ नाही. पण त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे.”

रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटकचा पुढचा सामना 2 फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना रेल्वे विरुद्ध होणार आहे. सूरतमध्ये दोन्ही संघात लढत होईर आहे. मात्र मयंकची तब्येत बिघडल्याने पुढील सामना खेळेल की नाही याबाबत आता साशंकता आहे.

मयंक अग्रवालने 5 फेब्रुवारी 2020 रोजी हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. मयंकने भारतासाठी 21 कसोटी, 5 वनडे सामने खेळले आहेत. मयंकने 4 शतकांच्या मदतीने 1488 धावा केल्या. तर एकदिवसीय सामन्यात 86 धावा केल्या.

🤙 9921334545