हार्वेस्टरला सबसिडी देण्यासाठी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री ना.अजित पवार

कोल्हापूर(प्रतिनिधी) हार्वेस्टरला सबसिडी देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात दिली. भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन माहिती तंत्रज्ञान याची ओळख करून दिली जाते.याचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमधून वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घ्यावे असे आवाहनही नामदार अजित पवार यांनी केले.

आज शेती क्षेत्रासमोर अनेक अडचणी आहेत. अवकाळी पाऊस, वातावरणात बदल होत चाललेले आहेत त्याचा परिणाम शेती व्यवसायावर झाला असून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी आणि त्यांना शासन स्तरावर मदत होण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नशील असल्याचे ना.पवार यांनी सांगितले.
आज दूध व्यवसाय द्राक्ष व्यवसाय अडचणीत आलेले आहेत ग्राहकां च्या फायद्यासोबत उत्पादकाचाही फायदा होणे आवश्यक आहे याचा विचार करून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्याचा शासन स्तरावर प्रयत्न चालू असल्याचे ना.पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांनीही नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून शेती करण्यावर भर दिला पाहिजे.येणारा काळ शेतीमध्ये बदल करण्याचा काळ असून त्या काळानुरूप शेतकऱ्यांनी नवनवीन अवजारांचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. त्यासाठीच हार्वेस्टरला सबसिडी देण्याकरता आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले. शिवाय शेतकऱ्यांनी दर्जेदार पीक बाजारात आणणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी
आज महिला पुरुषांच्या बरोबरीने शेती करत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी गाव पातळीवर सुविधा पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सुविधांचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा असे सांगितले.

यावेळी प्रास्ताविक पर भाषण करताना खासदार धनंजय महाडिक यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा कसा होईल याची माहिती दिली जाते यातून शेतकऱ्यांना वेगवेगळे ज्ञान मिळते असे सांगून आज पाऊस कमी पडत आहे, पाणीटंचाई आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हान आहेत ही आव्हाने पेलण्यासाठी अनेक शासकीय माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाते. शिवाय सध्या साखर कारखाने अडचणीत आहेत इथेनॉलचे प्रकल्प महत्त्वाचे आहेत इथेनॉल प्रकल्पाला चालना देण्यासाठी शासन स्तरावर प्रोत्साहन दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

सांगता व बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी कोल्हापूरचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ, माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार अमल महाडिक,आमदार राजेश पाटील,राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, माजी नगरसेवक जयंत पाटील, सत्यजित नाना कदम, आदिल फरास,राहुल चिकोडे,सौ. रूपा राणी निकम,सौ.अरुंधती महाडिक,पृथ्वीराज महाडिक.विश्वराज महाडिक, रिलायन्स पॉलिमर्सचे सत्याजित भोसले आदी उपस्थित होते.यावेळी आभार कृष्णराज महाडिक यांनी मानले.

🤙 9921334545